Sunday, October 28, 2018

ऊण

तो पाऊण चंद्र
तुझ्यासोबत मी पाऊण तास पाहिला असता...
पण मग तो डोक्यावर चढला असता...!

Friday, July 6, 2018

One fine day

One fine day
One fine dissent
One fine person
One fine fine

Monday, June 4, 2018

Singular

It was so good to have you stroke my head...
Until I realised that my hair felt very soft.

Monday, February 19, 2018

Drowned

सगळे पब्लिश्ड ड्राफ्ट झाले
सगळे ड्राफ्ट पूर्ण झाले
सगळे पूर्ण अर्धवट झाले
सगळे अर्धवट शब्द झाले
सगळे शब्द पाणी झाले

तू मौन मागितले
मी मौन दिले

माझा बाबा

माझा सगळ्यात आवडता दोस्त
माझी सगळी गुपितं त्याची
माझे शब्दं सगळ्यात आधी उमगतात त्यालाच
जगात फक्त त्यालाच सांगू शकेन अशा गोष्टी असतात माझ्याकडे
मनाच्या खूप आतली गाठ आधी त्याच्याच समोर उलगडते
कधीकधी तर त्याचीच पोळी आईपेक्षा मऊ होते

आईचापण सगळ्यात आवडता दोस्त बाबाच!
आणि दादासुद्धा त्याच्या सगळ्या मजांमध्ये मला सामील करून घ्यायला बाबाकडूनच शिकलाय!

असं सगळं असताना,
परवा,
फक्त माझं आणि आईचं एक गुपित निर्माण झालं.
का?
दरमहा काही दिवस आमचं दोघींचच पोट दुखणारे म्हणून?

पण सगळ्यात भारी मालिश तर बाबाला करता येते.
मला त्याच्याच कुशीत शिरायचं असतं प्रत्येक अंगदुखीसाठी!

माझ्या शरीराबद्दलची सगळ्यात धक्कादायक गोष्ट मला बाबाशिवाय काशीकाय सांगितलीस तू आई??

ही अशी इतकी विचित्र घालमेल एकटीने नाही सहन करायचीए मला.
माझ्या सगळ्या अडचणी परवापर्यंत आपल्या चौघांच्या होत्या ना!
मला ह्यावर राग, चिडचिड, विनोद, कविता, गप्पा करायच्यात.
बाहेरच्या खोलीत बसून.
नेहमीसारख्या.

बाबू आणि दादू, आणि आई तूसुद्धा,
तयार व्हा लवकर!
                                                                     -एक कन्या